Majhi Mayboli | माझी मायबोली

satyawan-s-satam

माझी मायबोली मराठी हाय
तिची कुणाला तोडच नाय
तिचा रुबाब न्यारा
तिचा सहवास प्यारा

रस्व ,दीर्घ ,काना, मात्रा
अलंकाराचा साज तिला
व्याकरणाचा तर
उच्चांक झाला

कुणालाही सहज कळावी
वाटेल तशी वळवावी
शब्दात हिच्या धार अशी
प्रहार करण्यास तलवार जशी

कथा, कादंबऱ्या, काव्यात हिच्या
नाद नाही करायचा
डंका आहे सर्वत्र
पुन्हा
माझ्या मायबोली मराठीचा
माझ्या मायबोली मराठीचा

—- सत्यवान सहदेव साटम

गावठणवाडी-जानवली, कणकवली, सिंधुदुर्ग.
 फेसबुक लिंक

Related posts

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments