तर जगणच असह्य झालं असतं | Then life would have become unbearable

lifestyle-satyawan-satam-janavali

जमलं नसतं तुझ्या शिवाय
मला जिवनात उभं राहणं
दुखः तुन मार्ग काढुन
सुखा कडे जाणं

तुझ्यातला आत्मविश्वास
मला आजही उभारी देतो
तु दिलेली साथ
मी जगाला ओरडून सांगतो

जमलं नसतं मला
आयुष्याचा गाडा एकट्याने ओढायला
तुझ्या सवे शिकलो मी
संसाराचा हिशोब मांडायला

आपल्याकडच्या संपत्तीला
जर आपण सत्ता म्हटलं
तर तुझ्या रुपानेच माझ्या
घरात प्रवेश केल्याचं पटलं

तुझे आपल्या घरातले योगदान
मी कधीच विसरणार नाही
माझ्या ॠदयातले तुझे स्थान
रक्ताने ही पुसणार नाही

सत्यवान सहदेव साटम
जानवली कणकवली
मो 9860317860

Related posts

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments