जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा विषय नसून, निसर्गाप्रती आपली जबाबदारी ओळखण्याची संधी आहे. वृक्ष आपल्याला प्राणवायू, सावली, अन्न आणि जीवन देतात. परंतु वाढत्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे. अशाच भावनेला शब्दबद्ध करणारी “वटवृक्षाचा दाह” ही कविता पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देते. वटवृक्षाचा दाह जमिनीत पाळंमुळं रोऊन, एका रोपाचा वटवृक्ष झालो असंख्य फांद्यांना जन्म देऊन, निसर्गाचा पाईक झालो…! प्रत्येक ऋतूत तटस्थ राहून, कर्तव्याचं मी पालन करतो सांगावं इथे कधी कुणाला, प्राणवायू कमी पडतो..! देता येईल जेवढं मला, सर्वांना सुख मी देतो माझ्या सावलीत तू, थोडासा विसावा…
Read More | पुढे वाचा