जानवली गाव हे शिक्षणाच्या बाबतीत अव्वल, मुळात सिंधुदुर्ग जिल्हा हा नेहमीच शिक्षण क्षेत्रात पुढेच असल्याने दर वर्षी जास्तीत जास्त मुलं मेरिट मध्ये येऊन कोकणचा मान उंचावत असतात. जानवली गावात देखील मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी दर वर्षी जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळातर्फे अनेक थोरामोठयांच्या सहकार्याने बक्षिसे दिली जातात व मुलांचे मनोधेर्य वाढविले जाते. जानवली गावात अनेक शाळा व विद्यालये आहेत जानवली शाळा नंबर १ हि सर्वात जुनी व मध्यवर्ती शाळा असून मुबंई गोवा महामार्गावर आहे. या शाळेत शिकलेले कित्येक विध्यार्थी आज ठिकठिकाणी आपल्या स्वकर्तृत्वावर मोठे झाले आहेत त्यांनी आपल्यासोबत आपल्या शाळेचे नाव देखील…
Read More | पुढे वाचाDay: December 12, 2022
Business / व्यवसाय
जानवली गाव तसं मुंबई गोवा महामार्गावर असल्याने अनेक उद्योगधंदे वा व्यवसायासाठी येथील वातावरण व परिसर हा पोषक आहे कणकवली सारख्या तालुक्याच्या अगदी लागूनच असल्याने उद्योगाच्या अनेक संधी येथे उपलब्ध आहेत किंबहुना बऱ्याच अंशी त्या दिशेने वाटचाल होत असताना पहावयास मिळते गावात पेट्रोल पंप आहे एलपीजी गॅस पंप आहे. तारांकित हॉटेल आहे नवं नवीन कॉलनी तसेच इमारतींचे प्रकल्प उभे राहत आहेत. अनेक बचत गट कर्यरत असून त्यांचे देखील काजू प्रोसेस प्रकल्प, शेती फळबाग प्रकल्प, मालवणी खाद्य पदार्थ निर्मिती व विक्री असे अनेक मार्गाने व्यवसायावर भर दिलेला पाहावयास मिळतो. शेती हा जरी…
Read More | पुढे वाचाTemples / मंदिरे
जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे. जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे…
Read More | पुढे वाचाActor / अभिनेता
यश साटम हा जानवली गावठणवाडी येथील श्री. नामदेव साटम यांचा नातू मुंबई मध्ये मास मेडिया शाखेत सहाव्या सत्रात शिकत असून मिरॅकल्सचे प्रमोद प्रभुलकर तसेच प्रख्यात नृत्य दिगदर्शिका फुलवा खामकर यांचे मार्गदर्शन खाली त्याने बरेच कार्यक्रम शॉर्ट फिल्म नृत्य शो केलेले आहेत. शॉर्ट फिल्म – दंगल एकांकिका – कलियुगी रामायण
Read More | पुढे वाचाElectronic Media / इलेक्ट्रॉनिक मीडिया
प्रणव साटम हा जानवली गावठणवाडी येथील श्री. नामदेव साटम यांचा नातू मुंबई मध्ये वाणिज्य शाखेत पदवीधर असून कोणतेही मार्गदर्शन नसताना कसलाही पूर्वानुभव नसताना त्याने सहकाऱ्यांच्या सहाय्याने स्वतःचे युट्युब चॅनेल बनविले आणि हि त्याची पहिलीच शॉर्ट फिल्म खुपच प्रसिद्ध झाली. शॉर्ट फिल्म – व्यायाम ट्रेनरचो व्यायाम शॉर्ट फिल्म – कोरोनाव्हायरस चा रामायण चॅनेल ला भेट द्या : https://www.youtube.com/@PranavSatam
Read More | पुढे वाचाLake / तलाव
जानवली गावात मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर तलाव असून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात आढळून येते. या तलावाचा परिसर अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. तलावाचे क्षेत्र विशाल असून पर्यटनासाठी भुरळ पडणारे आहे. या तलावाच्या पाणी पुरवठ्यामुळे आजूबाजूच्या किंबहुना पंचक्रोशीत चांगल्या प्रमाणात मुबलक पाणी पूरवठा होऊ शकतो
Read More | पुढे वाचाRiver / नदी
जानवली गावात एक सुंदर नदी कणकवली शहराच्या वेशीवर असून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात आढळून येते. हि नदी पावसाळ्यात अगदी तुडुंब भरून वहात असते. या नदीचा परिसर अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. नदीचे पात्र विशाल असून पर्यटनासाठी भुरळ पडणारे आहे. या नदीच्या पाणी पुरवठ्यामुळे आजूबाजूच्या किंबहुना पंचक्रोशीत चांगल्या प्रमाणात मुबलक पाणी पूरवठा होऊ शकतो
Read More | पुढे वाचाLingeshwar Temple / लिंगेश्वर मंदिर
देव श्री लिंगेश्वर हे एक जागृत देवस्थान असून हे पुरातन प्राचीन मंदिर गावच्या गर्द वनराईत निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे
Read More | पुढे वाचा